War Impact On Stock Market : पश्चिम आशियातील युद्धाला महिना पूर्ण झाला असून, या काळात जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजारालाही भीषण तडाखा बसला आहे. युद्धाचा अंत कधी होईल, याचा अंदाज कोणालाही नसून, वाढत्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये हाहाकार माजला आहे. केवळ मार्च महिन्यातच बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये ५१ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. ही घसरण इतकी मोठी आहे की, रिलायन्स इंडस्ट्रिज सारख्या तीन बड्या कंपन्यांचे एकूण मूल्य एका महिन्यात पुसले गेले आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीची धडधड
- युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय निर्देशांकांनी निचांकी पातळी गाठली आहे.
- सेन्सेक्समधील घसरण : महिनाभरात सेन्सेक्स सुमारे १२ टक्क्यांनी म्हणजेच १०,००० अंकांनी कोसळला आहे.
- निफ्टीची स्थिती: निफ्टीने २२,५०० ची महत्त्वाची पातळी तोडली असून तो आता त्याखाली व्यवहार करत आहे.
- मार्केट कॅपमध्ये घट: फेब्रुवारीमध्ये बीएसईचे एकूण मार्केट कॅप ४६३ लाख कोटी रुपये होते, ते आता ४१२ लाख कोटींवर आले आहे.
कच्च्या तेलाचा भडका आणि महागाईचे सावटयुद्धाचा सर्वाधिक परिणाम कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर झाला आहे. ब्रेंट क्रूड सध्या १०७ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. भारत हा तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने महागड्या तेलामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून नफा घटला आहे. याचा थेट परिणाम शेअरच्या किमतींवर झाला आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि FII ची विक्री
- बाजारातील घसरणीला परकीय गुंतवणूकदारांच्या अतोनात विक्रीने अधिक धार दिली आहे.
- जागतिक तणावामुळे परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत.
- सोमवारी रुपयाने ९४.५० प्रति डॉलरची पातळी ओलांडली असून तो आतापर्यंतच्या सर्वात निचांकी स्तरावर पोहोचला आहे.
सोने-चांदीच्या दरात घसरण, महागाईचा धोकासहसा युद्धाच्या काळात सोन्याचे भाव वाढतात, मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीच सोन्या-चांदीत मोठी तेजी आली होती. आता वाढत्या महागाईच्या धोक्यामुळे आणि जागतिक बँकिंगवरील दबावामुळे सोन्या-चांदीच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्लाइतिहास सांगतो की, जागतिक संकटांच्या वेळी बाजार कोसळतो, मात्र कालांतराने तो पुन्हा सावरतो. त्यामुळे
- घाईघाईने निर्णय घेऊ नका : घाबरून आपले शेअर्स विकू नका.
- संयम ठेवा : अशा काळात 'धैर्य' हाच सर्वात मोठा मंत्र आहे.
- सेक्टरवर लक्ष : बँकिंग, ऑटो आणि कन्झ्युमर सेक्टरला मोठा फटका बसला असला तरी, दर्जेदार शेअर्समध्ये टिकून राहणे फायदेशीर ठरेल.
वाचा - सोनं खरेदी करताय? २४ कॅरेटचे दागिने का बनवता येत नाहीत? जाणून घ्या सोनारांचे 'हे' गुपित
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : War in West Asia triggered a massive stock market crash. Indian indices plummeted, eroding ₹51 lakh crore. Investors are advised to remain calm, avoid panic selling, and focus on quality stocks amid volatility. Rupee fell to record low.
Web Summary : पश्चिम एशिया में युद्ध से शेयर बाजार में भारी गिरावट आई। भारतीय सूचकांक लुढ़के, ₹51 लाख करोड़ का नुकसान हुआ। निवेशकों को शांत रहने, घबराहट में बिक्री से बचने और अस्थिरता के बीच गुणवत्ता वाले शेयरों पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी जाती है। रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर।